सावंतवाडी : गणेशोत्सवात स्थानिक विक्रेत्यांना प्राधान्य द्या; परप्रांतीय व्यावसायिकांना विरोध

शेअर करा

नगरपालिकेने स्थानिक फळ, फूल, भाजी विक्रेते व व्यावसायिकांना प्राधान्य द्यावे; आशिष सुभेदारांचा इशारा

सावंतवाडी,दि.१ सप्टेंबर
सावंतवाडी शहरात गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक फळ फूल भाजी विक्रेते तसेच स्थानिक व्यवसायिकाना नगरपालिकेने प्रथम प्राधान्य द्यावे या ठिकाणी परप्रांतीय व्यावसायिकांची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा सेना तालुका प्रमुख आशिष सुभेदार यांनी दिला आहे.


गणेश चतुर्थी सणाला थोडेच दिवस बाकी आहेत. या सणाच्या निमित्ताने सावंतवाडी शहरात दरवर्षी प्रमाणे भाजी फळे फुले वस्तू सजावटीचे सामान, घेऊन मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय विक्रेते दाखल होतात. हे विक्रेते आपली मुजोरी दाखवत बहुतांशी जागा अडवून ठेवतात त्यामुळे स्थानिक विक्रेते आहेत त्यांना व्यवसाय करण्यास तांत्रिक अडचणी निर्माण होतात. शहरात दरवर्षी गणेश चतुर्थी सणाला होणारी गर्दी पहाता नगरपालीकेकडून नियोजन केले जाते भाजी फळ फूल विक्रेते यांना वेगळी जागा ठरवून दिली जाते मात्र तुलनेने स्थानिक व्यापारी विक्रेते यांच्या नशिबी फार कमी जागा येते त्यामुळे दरवर्षी ऐन गणेशोत्सवात स्थानिक विक्रेते व्यावसायिक व्यापारी यांच्यावर पालिका प्रशासनाकडून अन्यायच होत आला आहे. यावर्षी सणा सुदिला स्थानिकांना जागा वाटपात जास्त प्राधान्य प्रशासनाने द्यावे, परप्रांतीय व्यावसायिक यांची वाढणारी मक्तेदारी यावेळी खपवून घेतली जाणार नाही. यामध्ये मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी लक्ष घालून यंदाच्या गणेशोत्सवात स्थानिक विक्रेते व्यापारी व्यावसायिक यांना प्रथम प्राधान्य द्यावे अन्यथा उबाठा शिवसेना पक्षाच्या वतीने प्रशासनाला घेराव घालण्यात येईल असा इशारा उबाठा शिवसेना पक्षाचे युवा सेना तालुका प्रमुख आशिष सुभेदार यांनी दिला आहे.

शेअर करा