वीज पुरवठा खंडित; तालुक्यात १७ मिमी पावसाची नोंद, सकाळपर्यंत ढगाळ वातावरण कायम
सावंतवाडी दि.२४ मे
भल्या पहाटे विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट करत पाऊस झाला. या दरम्यान वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने ग्राहकांना मात्र त्रास सहन करावा लागला.सकाळी १७ मी मी एवढा पाऊस तालुक्यात नोंदला गेला. सकाळी उशिरा पर्यंत ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे जनता हैराण झाली आहे. अधुनमधून पाऊसाचा शिडकावा होत असल्याने आणखी उष्णता जाणवत होती.
भल्या पहाटे विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट करत पाऊस दाखल झाला. हा पाऊस विशेषतः सर्वच ठिकाणी झाला. शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. तर नागरिकही पावसाळ्याच्या तोंडावर कामे झटपट आटोपून घेत आहेत.