सावंतवाडी : ६५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ चालकांसाठी सन्मान निधी योजना; ३ सप्टेंबरला १० हजारांचे धनादेश वितरण

शेअर करा

सावंतवाडी ,दि.३० ऑगस्ट
धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र सभासदांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा सन्मान निधी वितरीत करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२६ रोजी वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या आणि १ जून २०२६ पर्यंत मंडळाकडे नोंदणी केलेल्या सर्व पात्र चालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
​लाभार्थी चालकांनी आपल्या बँक खात्याचा तपशील मंडळाच्या ananddighekalyankarimandal.org या अधिकृत संकेतस्थळावर तातडीने ऑनलाइन नोंदवणे बंधनकारक आहे.
​या सन्मान निधीचे वितरण गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे आयोजित विशेष कार्यक्रमात होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्या हस्ते हे १० हजार रुपयांचे धनादेश किंवा रक्कम ऑनलाइन माध्यमातून जमा केली जाणार आहे.
​परिवहन विभाग, सिंधुदुर्ग यांच्याकडून प्राप्त झालेल्या यादीतील ज्या चालकांची नावे व संपर्क क्रमांक आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी बँक खाते ऑनलाइन अपडेट केले आहे किंवा नाही याची शहानिशा केली जात आहे. ज्या चालकांची ६५ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि ज्यांची नावे यादीत आहेत, त्यांनी संबंधित RTO किंवा Dy RTO कार्यालयाकडे आपली उपस्थिती निश्चित करावी, असे आवाहन कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ (सिंधुदुर्ग विभाग) यांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे, अशी माहिती पदाधिकारी सुधीर पराडकर यांनी दिली.

शेअर करा