सावंतवाडी,दि.२८ ऑगस्ट
सावंतवाडी नगर परिषदेची पाणी बिले तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे शहरवासीयांना माहे जून आणि जुलै या महिन्यांची पाणी बिले मिळण्यास उशीर होणार आहे, अशी माहिती सावंतवाडी नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
या संदर्भात पालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पाणी बिल प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे बिले वेळेत वितरित करणे शक्य झालेले नाही. तरी नागरिक व पाणी वापरकर्त्यांनी या विलंबाची नोंद घ्यावी, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी सूचनेद्वारे केले आहे.