सावंतवाडीत श्रावणमास समाप्तीनिमित्त श्री देव पाटेकर मंदिरात महाप्रसादाचे आयोजन

शेअर करा


सावंतवाडी, दि.०२ सप्टेंबर


येत्या श्रावणी सोमवारी (७ सप्टेंबर) सावंतवाडी संस्थानकालीन श्री देव पाटेकर मंदिरात श्रावणमास समाप्ती सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी देवदर्शनानंतर ११ वाजल्यापासून महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होईल.
​सावंतवाडी संस्थानच्या राजमाता कै. श्रीमंत सत्वशीलादेवी भोसले यांच्या कृपाशीर्वादाने अनेक वर्षांपासून हा प्रसाद सोहळा अविरत पार पडत आहे. यंदाही संस्थानचे श्रीमंत खेमसावंत भोसले, श्रीमंत शुभदादेवी भोसले, श्रीमंत लखमसावंत भोसले आणि श्रीमंत श्रद्धा सावंत भोसले यांच्या सूचनेनुसार मंदिरात सकाळी देवदर्शन व ११ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
​प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही सर्व भाविकांनी उपस्थित राहून देवदर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी आमदार शिवराम दळवी यांनी केले आहे.

शेअर करा