सावंतवाडी : मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थीनींचे कथाकथन स्पर्धेत उत्तुंग यश!

शेअर करा

सावंतवाडी,दि.१ सप्टेंबर
बांदा नट वाचनालयातर्फे दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित बालवाचक कथाकथन स्पर्धेत सिं.जि.शि. प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी कु. माही मनोहर तवटे हीने तिसरी ते चौथी या गटासाठी असलेल्या ‘मला आवडलेली साने गुरूजींची कोणतीही एक गोष्ट’ या विषयास अनुसरून उत्कृष्ट कथाकथन सादर करत द्वितीय क्रमांक पटकावला. तर कु. अनिका शंकरानंद राऊळ हीने पाचवी ते सातवी या गटासाठी असलेल्या ‘पहिली भारतीय महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले’ या विषयास अनुसरून ओघवत्या शैलीत कथाकथन सादर करून उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला.या यशाबद्दल त्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सह- संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत व डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.

शेअर करा