सावंतवाडी म्युनिसिपल नोकर सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; १४% लाभांश जाहीर

शेअर करा

सावंतवाडी,दि.३० ऑगस्ट
सावंतवाडी म्युनिसिपल नोकर सहकारी पतपेढी लि. सावंतवाडी या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी सावंतवाडी नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात संपन्न झाली. संस्थेचे चेअरमन दीपक म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा अत्यंत उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
​सदर सभेला सर्व संचालक, सेक्रेटरी आणि मोठ्या संख्येने संस्थेचे सभासद उपस्थित होते. या आर्थिक वर्षात संस्थेला रु. ८,७१,६९६/- इतका निव्वळ नफा झाला असून, सभासदांना १४% लाभांश (डिव्हिडंड) वाटप करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सभेत लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करण्यात आले तसेच अंदाजपत्रकीय खर्चास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
​विद्यमान संचालक मंडळाची मुदत नोव्हेंबर २०२६ मध्ये संपणार असून, त्यानंतर नवीन संचालक मंडळ स्थापन होणार असल्याचेही सभेमध्ये स्पष्ट करण्यात आले. याशिवाय संस्थेच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय यावेळी घेण्यात आले.

शेअर करा