सावंतवाडी दि.१ सप्टेंबर
नेमळे गावकर कुंभारवाडी मधून धनगर वाडी वस्तीवर जाणाऱ्या रस्त्याची ग्रामपंचायत नमूना न 23 मध्ये अद्याप नोंद झाली नसल्याने नेमळे ग्रामपंचायतीडून या रस्त्यावर कुठच्याही प्रकारची डागडुजी किंवा सुधारणा झाली नाही पिढ्यानपिढ्या या रस्त्यावरून शाळकरी मुले शेतकरी ग्रामस्थ त्यांची पाळीव जनावरे यांची सतत रहदारी ये जा चालू असते सदर रस्ता खड्डेमय झाला असुन रस्त्यावरून चालणे ही धोकादायक झाले आहे .सन 2022 च्या उपमुख्यकार्यकारीअधिकारी ग्रामपंचायत जि. प. सिंधुदुर्ग यांच्या कडून धनगर समाजाच्या मूलभूत गरजा चे निराकरण करणे बाबतच्या4 /5 /2022 च्या बैठकीमध्ये धनगर वाड्या वस्त्यांमध्ये जाणाऱ्या रस्त्याकरिता भूसंपादन करून रस्ते मिळणेबाबतचे निवेदन नेमळे ग्रामपंचायतीला प्राप्त झाले होते मात्र नेमळे ग्रामपंचायतीने यासंदर्भात कुठच्याही प्रकारचा पाठपुरावा केला नसल्यामुळे आज नेमळे गावातील धनगर वाडी वस्त्यावरील जाणाऱ्या रस्त्याची ग्रामपंचायत नमूना न 23 ला अद्याप नोंद झाली नसल्याने धनगर समाज या रस्त्यापासून वंचित राहिला आहे सदर गावकर कुंभारवाडी मधून जाणाऱ्या धनगरवाडी रस्त्याची लवकरात लवकर ग्रामपंचायत नमूना न 23 ला नोंद व्हावी नाहीतर धनगर वाडीवरील सर्व ग्रामस्थ महिला मुले या सर्वांना घेऊन नेमळे ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन गावकर कुंभारवाडी धनगर वाडी वस्तीकडून नेमळे ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे