सावंतवाडी,दि.२९ ऑगस्ट
आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनीप्रयत्न जिद्द आणि चिकाटी हे त्रिसूत्री जोपासली तर निश्चित यश मिळते .असे यश मिळवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने अशा स्पर्धेतून सहभाग घेतला पाहिजे निवृत्त होऊनही शैक्षणिक सामाजिक सहकार सातत्याने कार्य करणारे पेडणेकर सर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेतूनविद्यार्थ्यांना तसेच इतरांना प्रेरणादायी ठरे असे मत शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी व्यक्त केलेविद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीआयोजित गुरुनाथ शंकर पेडणेकरमाझी शिक्षण व आरोग्य सभापती पुरस्कृत वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून विचार व्यक्त केले .यावेळी
व्यासपीठावर जीवन विद्या मिशनचे प्रचारक शिवाजीराव पालव हे अध्यक्ष स्थानावरून विचार व्यक्त करताना जीवन जगत असताना शिक्षण शिकवण आणि संस्कार यांनी अंतर्मन प्रभावित होते आणि ते संस्कार वर्तनातून व्यक्त होत असतात आणि म्हणून पालक शिक्षक यांचा मुलांच्या जडणघडणीत मुलाचा वाटा असतो .विद्यार्थी हे भविष्यातील देशाचे आधारस्तंभ आहेत आणि म्हणून ते संस्कारी असणे महत्त्वाचे आहे
व्यासपीठावर विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सावंत सचिव गुरुनाथ पेडणेकर सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर आनंद राणे केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर डॉ .भाग्यवंत गौरवी पेडणेकर संजय शेवाळे आदी उपस्थित होते
स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट करताना गुरुनाथ पेडणेकर म्हणाले आपल्या शाळेतील त्याचबरोबर जिल्ह्यातील विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेतूनआपले विचार व्यक्त करतात आणि आत्मविश्वासाने जगण्यास शिकतात यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेचेचौथे वर्ष असून स्पर्धेला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळतो यातून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी सहभागी होतातस्पर्धेत एकूण 44 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ स्वेता कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी व्यासपीठावर सचिन पालो दत्ताराम पेडणेकर रामचंद्र नाईक बाळा आकेरकर परीक्षक म्हणून भरत गावडे गुरुनाथ नार्वेकर विनोद गावकर राधा प्रथमेश गवंडे विदया पालव चंद्रलेखा सावंत तसेच शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते
स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी या गटातून प्रथम क्रमांक सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर शाळा बांदा नंबर १द्वितीय क्रमांक रुंजी सुदर्शन सावंत दिव्य ज्योती हायस्कूल डेगवे तृतीय क्रमांक योगेश यशवंत आयकर ओझर विद्यालय कांदळगावउत्तेजनार्थ प्रथम मीरा महादेव सामंत माध्यमिक विद्यालय पाट उत्तेजनार्थ द्वितीय युगंधरा हिराकांत खानोनोलकर इंग्लिश स्कूल इयत्ता आठवी ते दहावी मोठा गट प्रथम क्रमांक मृदुला नाना सावंत दिव्य ज्योती हायस्कूल डेंगळे द्वितीय क्रमांक दिव्यल दिनेश गावडे नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली तृतीय क्रमांक अस्मि प्रवीण मांजरेकर आरपीडी सावंतवाडी उत्तेजनार्थ प्रथम शाकुंत संदेश परब हिराबाई हायस्कूल वराड मालवण उत्तेजनार्थ द्वितीय हंशिका जगन्नाथ वजराटकर नाथ पई हायस्कूल कुडाळ स्पर्धेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय शेवाळे सूत्रसंचालनशाळेची विद्यार्थिनी कुमारी मैथिली सावंत हिने तर आभार सौ मधुरा तांबे यांनी मानले