सावंतवाडी : साहित्य प्रेरणा कट्ट्यावर श्रावणरंग

शेअर करा

सावंतवाडी,दि.३० ऑगस्ट
सध्या श्रावण मास सुरू आहे. निसर्गाच्या विविध रूपांनी नटलेला हा श्रावण साहित्यातही बरसत असतो. या महिन्यात धर्मग्रंथांचे वाचन केले जाते, हरिनाम सप्ताह साजरे होतात. या सर्व बाबींना उजाळा देण्यासाठी आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्यातर्फे ‘रंग श्रावणाचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

र.ग. खटखटे ग्रंथालयात होणाऱ्या साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या या सलग सत्तराव्या मासिक कार्यक्रमात साहित्यरसिक श्रावणमासा संबंधित पुराणकथा, कविता, ललित लेख सादर करतील. तसे धर्मग्रंथांचा परिचय करून देतील. सदर कार्यक्रम ग्रंथालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डाॅ.श्रीराम दीक्षित यांच्या संकल्पनेतून आयोजित केला आहे.

‘रंग श्रावणाचे ‘ या नावाने सादर होणारा हा कार्यक्रम सोमवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता शिरोडा येथील र.ग.खटखटे ग्रंथालयात आयोजित केला आहे.

तरी या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी जरूर उपस्थित रहावे, असे आवाहन कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यानी केले आहे.

शेअर करा