सावंतवाडी,दि.२७ ऑगस्ट
सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. सावंतवाडी उभाबाजार येथील राजू मसुरकर यांच्या ‘जीवनरक्षा’ कार्यालयात ही बैठक होणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष अभय मालवणकर यांनी दिली आहे.
या बैठकीस काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये व जिल्हा सरचिटणीस सुभाष दळवी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीसाठी तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, प्रांतिक सदस्य, सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, ओबीसी विभाग, अल्पसंख्याक विभाग तसेच सर्व सेलचे तालुका अध्यक्ष, लोकसभा व विधानसभा उमेदवार, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि आजी-माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष अभय मालवणकर यांनी केले आहे.