सावंतवाडी,दि.२८ ऑगस्ट
उल्हासनगर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून डॉ. कासम युसुफ दलवाई यांनी सन २०२४ ते २०२६ या कालावधीत उल्लेखनीय आणि सेवाभावी कार्य केले.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत असताना त्यांनी सर्वसामान्य रुग्णांना अत्यंत प्रामाणिकपणे, तत्परतेने आणि माणुसकीच्या भावनेतून वैद्यकीय सेवा दिली. खासगी रुग्णालयात मोठा खर्च करून मिळणारी सेवा ज्या प्रकारे उपलब्ध होते, त्यापेक्षाही अधिक आपुलकीने आणि जबाबदारीने डॉ. कासम यांनी रुग्णांची सेवा केली, अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करतात. ज्या अत्यंत जोखमीच्या शस्त्रक्रिया मोठया रुग्णालयात होतात त्या त्यांनी कमी सुविधा असतानाही शासकीय रुग्णालयात पार पाडल्या. चोवीस तास उपलब्ध असलेल्या या शल्यचिकित्सकने अनेक तातडीच्या अणि जोखमीच्या शस्त्रक्रिया करून कितीतरी माता अणि अर्भक यांचे जीव वाचवले.
शासकीय रुग्णालयातील कामाचा बोझा, अपुऱ्या सुविधा अणि कर्मचारी यावर पडणारा ताण अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे शासकीय रुग्णालयाबद्दल नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण होण्यास मदत झाली. अणि काही दिवसात उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ येथील शासकीय रुग्णालयात स्थलांतर घेऊन येणार्या रुग्णांचा ओघ वाढला. ज्यांना मुले होत नाहीत अशा जोडप्यांना संतती प्राप्तीसाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. डॉ कासम यांनी आधुनिक उपचार अणि आयुर्वेद यांच्या संयुक्त उपचाराने सरकारी रुग्णालयात मोफत उपचार देत कितीतरी जोडप्यांना संतती प्राप्त करून दिली. PCOD आजाराने त्रस्त मुली अणि महिला यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली त्यांचा दुवा डॉ कासम यांच्या पाठीशी आहे. उल्हासनगरयेथील समाजसेवक, लोकप्रतिनिधी अणि पुढारी यांच्या समन्वयाने रुग्णसेवा बळकट केली. वेळोवेळी आशाताई यांना प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या कामात सक्षम केले.
आज दररोज विविध वृत्तपत्रे आणि सामाजिक माध्यमांवर शासकीय आरोग्य सेवा, रुग्णालयातील सुविधा आणि डॉक्टरांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र, या पार्श्वभूमीवर डॉ. कासम युसुफ दलवाई यांचे कार्य निश्चितच एक सकारात्मक आणि प्रेरणादायी अपवाद ठरते.
त्यांच्या बदलीमुळे उल्हासनगरकरांना एका चांगल्या, कर्तव्यनिष्ठ आणि सेवाभावी डॉक्टरच्या सेवेपासून मुकावे लागले आहे, ही निश्चितच खेदाची बाब आहे.
डॉ. कासम युसुफ दलवाई यांच्या पुढील सेवेसाठी मनःपूर्वक 💐शुभेच्छा! त्यांच्या कार्याला आणि रुग्णसेवेला मनःपूर्वक सलाम