सावंतवाडीत १ सप्टेंबारला चीवार टेकडीवरील पाण्याची टाकी साफ करणार; २ व ३ सप्टेंबरला ‘या’ भागांचा पाणीपुरवठा बंद

शेअर करा

सावंतवाडी,दि.२८ ऑगस्ट
सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत चीवार टेकडी येथील पाण्याची साठवण टाकी दिनांक १ सप्टेंबर रोजी साफ करण्यात येणार आहे. त्यामुळे या टाकीवरून पाणी पुरवठा होणाऱ्या शहरासह परिसरातील विविध भागांमधील पाणीपुरवठा २ आणि ३ सप्टेंबर रोजी पूर्णपणे बंद राहणार असून, त्यानंतरचे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. याबाबतची जाहीर सूचना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.
​’या’ भागांतील पाणीपुरवठा राहणार बाधित:
टाकीच्या स्वच्छतेच्या कामामुळे सबनीसवाडा, बाहेरचावाडा, काजरेकर घरापासून काजरकोंड पर्यंत, सिक्वेरावाडा, लाडाचे बाग, सुवर्ण कॉलनी, बिरोडकर टेंब, कॉटेज हॉस्पिटल, आयुर्वेद हॉस्पिटल, खासकीलवाडा, महादेवभाटले, कामत लाईन, रसाळ पाणंद, तिलारी रोड, समाजमंदिर परिसर, जिमखाना मैदान, गोठण, बाजरवाडी, नाडकर्णी पाणंद, तसेच चराठा ग्रामपंचायत या भागांतील पाणीपुरवठा बाधित राहणार आहे.
संबंधित परिसरातील नागरिकांनी दिनांक २ सप्टेंबर व ३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पाणीपुरवठा बंदीची नोंद घ्यावी. तसेच पुढील दोन दिवस पाणी कमी दाबाने येणार असल्याने नागरिकांनी आदल्या दिवशी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा व नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शेअर करा