​सावंतवाडी : अन्यथा एनटीसी कार्यालयावर कामगारांचा धडक मोर्चा!

शेअर करा

​सावंतवाडी,दि.१२ सप्टेंबर

एनटीसी गिरण्या पूर्ववत चालविण्याचा,अथवा व्यवस्थापनाने कामगारांचा थकित पगार दिला नाही तर फोर्ट येथील एनटीसी कार्यालयावर कामगारांचे तीव्र आंदोलन छेडले जाईल,असा इशारा राष्ट्रीय मिल मजूदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी कामगारांच्या साखळी उपोषणा पुढे बोलताना दिला आहे.
कामगार नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी गेल्याच महिन्यात एनटीसी गिरण्यांच्या प्रश्नावर सरकारशी सकारात्मक चर्चा केली होती,त्याची अंमलबजावणी लवकर व्हावी यासाठी राष्ट्रीय मिल मध्ये संघाच्या वतीने ७ सप्टेंबर पासून एनटीसीच्या मुंबईतील (१)टाटा,(२) इंदूमि.क्र. ५(३)पोद्दार (४)दिग्विजय या चार गिरण्यावर कामगारांनी साखळी उपोषण छेडले.सरचिटणीस गोविंदराव मोहिते,खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ अण्णा शिर्सेकर बजरंग चव्हाण,सुनील बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचे आंदोलन छेडण्यातआले,आज आंदोलनाच्या सहाव्या दिवशी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी कामगारांपुढे बोलताना व्यवस्थापनाला इशारा दिला आहे.
उपाध्यक्ष सुनील बोरकर यांनी सांगितले की,गेले अकरा महिने कामगारांना पगार न दिल्यामुळे उपासमारीला कंटाळून कामगार आता रस्त्यावर येतील.
गौरी गणपतीच्या सणामध्ये आंदोलन थांबविण्यात आले असले तरी,सण संपतासंपताच मागण्या मिळेपर्यंत कामगारांचा लढा निर्धाराने सुरूच राहील,असे गोविंदराव मोहिते कामगारांकडे बोलताना म्हणाले.

शेअर करा