तळेरे,दि.२८ ऑगस्ट
कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावात वसलेला 1200 वर्षे जुन्या खारेपाटण दुर्गावर “कोकणचे शिलेदार” संघाकडून गडावर २३ सावी श्रमदान मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. ह्या २३ मोहिमे मध्ये खारेपाटण गडावर प्राचीन पायरी विहीर व गडाचा महादरवाजा मातीच्या ढिगाऱ्या खाली दडला गेला होता. कोकणचे शिलेदार संघाकडून सत्यतरित्या प्रयत्न करून पायरी विहीर व दुर्गाचा महादरवाजा जुन्या स्वरूपात आणण्यात यश आले आहे. यासाठी प्रत्येक शिलेदाराने अथक परिश्रम घेतले आहेत.
खारेपाटण दुर्गावर त्याच जोशामध्ये नवीन मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. नवीन मोहीम ही पूर्व बुरजा जवळ असलेल्या दरवाज्या जवळ सुरु करण्यात आली. ह्या मोहिमेचे उध्दाटन श्री. शाम ताकमोगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघातील कु. शुभम राऊत, सिद्धी राऊत, सार्थक जाधव, सुमेधा तावडे, यश राऊत, अभिषेक शिरकर, दुर्वास सावंत, श्रेयस बाविलकर, कुणाल निकम, प्रथम चव्हाण, अक्षय तेली. इत्यादी मोहिमेसाठी उपस्थित होते.