तळेरे : ओझरम येथे नव्याने झालेल्या बीएसएनएल टाॅवरचा शुभारंभ

शेअर करा

तळेरे,दि.३० ऑगस्ट

अनेक वर्षानतंर ओझरम गावात मोबाईल टाॅवर झाल्याने खूप आनंदाचा दिवस आहे. टाॅवर मंजूर झाल्यानंतर ग्रामस्थानी हे काम पूर्ण होण्यासाठी केलेली धडपड कौतुकास्पद आहे.आपले गाव नेटवर्कमुळे जोडले गेल्याने याचा फायदा परिसरातील गावांसह शाळकरी मुले,नोकरदार, शासकीय कर्मचारी व नागरीकांना होणार आहे.यापुढेही गावच्या विकासात्मक कामासाठी नेहमीच सहकार्य करु करू असे कणकवली सभापती सौ. हर्षदा वाळके यानी सांगितले.त्या ओझरम येथे नव्याने झालेल्या बीएसएनएल टाॅवरच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या.

टॉवरचा शुभारंभ अनंत (नाना) राणे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आला.यावेळेस कणकवली पं. स.सभापती हर्षदा वाळके,जि‌.प.सदस्य संतोष पारकर,पं. स. सदस्य सहदेव खाडये, मा.जि.प.सदस्य संजय देसाई, सरपंच समृद्धी राणे, शिरवली सरपंच सुजिता मोहिते, शिवसेना संपर्कप्रमुख मनोज राणे,कासार्डे उपसरपंच गणेश पाताडे, सुरेश राणे, गजानन राणे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनायक राणे,अमर राणे, सुधाकर राणे, ग्रामपंचायत अधिकारी संगिता पाटील, एल.डी.राणे, पोलीस पाटील तुषार तांबे, सदाशिव राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

या टॉवरसाठी विशेष मेहनत घेणारे नाना राणे, सुरेश राणे, गजानन राणे यांच्यासह मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.यावेळेस मनोज राणे, विनायक राणे,संजय देसाई , सहदेव खाडये, गजानन राणे, समृद्धी राणे संतोष पारकर यानी मनोगत व्यक्त केले. सदर खा. नारायण राणे,मंत्री तथा पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर होत कार्यान्वित झाल्याने ओझरम ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करीत कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश राणे , सुत्रसंचलन जे.डी. राणे यानी केले.

शेअर करा