Talere News : महिला व्यापारी संघटना तळेरेचा आरोग्यदायी उपक्रम

शेअर करा

१२३ नागरिकांनी घेतला मोफत नेत्र तपासणीचा लाभ!

तळेरे,दि.२८ ऑक्टोंबर

महिला व्यापारी संघटना, तळेरे आणि ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणकर कॉम्प्लेक्स, तळेरे बाजारपेठ येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १२३ नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला.

  जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष दिपक भोगले, व्यापारी महासंघाचे कार्यवाह चंद्रकांत (राजू) जठार, ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल आर. सावंत, तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर, बाजारपेठ मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर डंबे, माजी सरपंच चंद्रकांत तळेकर, प्रविण वरुणकर, पंढरीनाथ महाडिक आणि महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षा सौ. संपदा सुयोग महाडिक यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

शिबिरात मोफत नेत्रतपासणी, दृष्टीक्षमता तपासणी, मोतीबिंदू तपासणी तसेच चष्म्यांचे योग्य दरात वितरण करण्यात आले. नेत्रचिकित्सक सचिन हरमलकर, ऑप्टिकल टेक्निशियन अनिकेत शिंदे आणि विष्णू तेंडुलकर यांनी यावेळी मोलाचे सहकार्य केले.

महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षा सौ. संपदा सुयोग महाडिक म्हणाल्या, “निरोगी दृष्टी, निरोगी जीवन — आरोग्याची काळजी हीच खरी संपत्ती. नागरिकांचे आरोग्य चांगले राहीले पाहिजे. याच सामाजिक जाणीवेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. १२३ नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला, याचे मनापासून समाधान आहे. सर्व मान्यवर, ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशनची टीम, वैद्यकीय सहकारी आणि संघटनेच्या महिला सदस्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. भविष्यातही महिला सक्षमीकरणासोबत आरोग्य आणि समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यासाठी आमची संघटना कटिबद्ध आहे. असे यावेळी सांगितले.”

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी उपाध्यक्षा सौ. रोशनी पिसे, सौ. रेश्मा तळेकर, सचिव सौ. श्रावणी मदभावे, सहसचिव सौ. साक्षी सुर्वे, सौ. रुचा पावसकर, सौ. पद्मा कांबळे, सौ. विशाखा पावसकर, सौ. पूर्वा खरावकर, सौ. वैष्णवी कल्याणकर, सौ. जिया कल्याणकर, सौ. श्रेया कल्याणकर, सौ. राधिका खरावकर, सौ. सायली डंबे आणि इतर महिला सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल आर. सावंत व त्यांच्या संपूर्ण टीमसह सर्व मान्यवर, सहकारी सदस्य आणि नागरिकांचे अध्यक्षा सौ. संपदा महाडिक यांनी आभार मानले.

शेअर करा