वैभववाडीत विषारी द्रव्य प्राशन केलेल्या २६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

शेअर करा

संदेश साटम याने सोमवारी विषारी द्रव्य प्राशन केले; कणकवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी मृत्यू

वैभववाडी,दि.२६ ऑगस्ट
   विषारी द्रव्य प्रशान केलेल्या अविवाहित तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. संदेश संतोष साटम वय 26 रा. वैभववाडी बाजारपेठ असे या मयत तरुणाचे नाव आहे.
  मयत संदेश साटम याने सोमवारी दुपारी विषारी द्रव्य प्राशन केले. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला तातडीने वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्याला कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी सहा वाजता त्याची प्राणज्योत मालवली.
मयत संदेश साटम हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वैभववाडी येथील शासकीय विश्रामगृहात कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार म्हणून गेले वर्षभर कार्यरत होता मात्र त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी संतोष साटम यांचा तो मुलगा होता. त्याच्या पश्चात वडील, भाऊ असा परिवार आहे.

शेअर करा