वेंगुर्ला : आनंदयत्रीतर्फे मुख्याध्यापक सन्मान सोहळ्याचे आयोजन

शेअर करा

वेंगुर्ला ,दि.१ सप्टेंबर (प्रथमेश गुरव)

आनंदयत्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला यांच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून रविवार दि. ६सप्टेंबर रोजी दुपारी ३ वा. वेंगुर्ला-कॅम्प येथील बॅ.नाथ पै स्मारक हॉल येथे मुख्याध्यापक सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी देवगड येथील बीएड कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.सर्जेराव गर्जे हे उपस्थित राहणार आहे. तरी यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष वृंदा कांबळी आणि सचिव प्रा.डॉ.सचिन परूळकर यांनी केले आहे.

शेअर करा