वेंगुर्ला,दि.१२ सप्टेंबर
सोमवारपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. आज शनिवारपासूनच काही गणेशभक्तांनी आपापल्या गणेशमूर्त्या घरी न्यायला सुरूवात केली आहे.
दिवसेंदिवस गणपती पूजन करणाऱ्या भक्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने मूर्तीशाळाही वाढल्या आहेत. त्यात अलिकडे वाहतुक व्यवस्थाही उपलब्ध झाली आहे. तसेच गावोगावी सुबक आणि आकर्षक गणेशमूर्त्या घडविणारे मूर्तीकार निर्माण झाले आहेत. त्यामुळे हौशी गणेशभक्त अशा मूर्तीकारांचा शोध घेऊन त्यांच्याकडे आपली गणेशमूर्ती बनविण्यासाठी देत आहेत. दरम्यान, पावसाचा व्यक्तेय, वाहतूक कोंडी यांचा त्रास नको म्हणून तसेच गणपतीकडे होणारी आरास करणे सुलभ व्हावे यासाठी काही गणेशभक्तांनी आपल्या गणेशमूर्त्या घरी न्यायला सुरूवात केली आहे.