वेंगुर्ला : इनरव्हीलतर्फे पोस्ट कार्यालयात रक्षाबंधन

शेअर करा

वेंगुर्ला,दि.३० ऑगस्ट (प्रथमेश गुरव)

इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ल्याच्यावतीने वेंगुर्ला येथील मुख्य पोस्ट कार्यालयातील कर्मचारी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाचे प्रतिक असलेला सण आहे. समाजातील विविध क्षेत्रांत सेवा देणाऱ्या कर्मचारी बांधवांप्रती आपुलकी व कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी बांधवांना राखी बांधली व रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी क्लब अध्यक्षा ज्योती देसाई, आय.एस.ओ.गौरी मराठे, ई.सी.मेंबर डॉ.पूजा कर्पे, मेंबर रसिका मटकर, वैभवी दाभोलकर, तसेच पोस्ट मास्तर सौ. वाडेकर व पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी वृंद उपस्थित होते.
या उपक्रमातून बंधुभाव, प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देण्यात आला. पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी बांधवांनी इनरव्हील क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक करून सदस्यांचे आभार मानले.

शेअर करा