वेंगुर्ला : जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग व डेडलिफ्ट स्पर्धेत नाईक जिमची दमदार कामगिरी

शेअर करा

वेंगुर्ला,दि.३० ऑगस्ट (प्रथमेश गुरव)

त्रिनेत्र मित्रमंडळ संचलित ‘मिशन फिटनेस आचरा’ आणि कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पॉवरलिफ्टिंग व डेडलिफ्ट स्पर्धेत वेंगुर्ला येथील नाईक जिम अँड फिटनेस सेंटरच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत पदकांची लयलूट केली. खेळाडूंनी २५ सुवर्ण, ७ रौप्य, ३४ कांस्य अशी एकूण ६६ पदके मिळवत आपल्या नाईक जिमचा ठसा जिल्ह्यात उमटवला आहे.


या स्पर्धेत नाईक जिमच्या खेळाडूंनी विविध गटांमध्ये सहभागी होत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके पटकावली. या यशामुळे नाईक जिम अँड फिटनेस सेंटरचे नाव सिंधुदुर्गातील पॉवरलिफ्टिंग व डेडलिफ्ट क्षेत्रात पुन्हा एकदा ठळकपणे पुढे आले आहे.
स्पर्धेत हितार्थ वागळे यांनी ४ सुवर्णपदके, साईराज मातोंडकर यांनी ४ रौप्यपदके, सोहम मेस्त्री यांनी ४ कांस्यपदके, तर श्रेया परब यांनी ३ सुवर्ण व १ कांस्यपदक मिळविले.


तसेच गौरव मोरजकर यांनी ३ कांस्य, अस्मि तल्हा यांनी ४ सुवर्ण, ईशान तल्हा यांनी २ रौप्य व २ कांस्य, सोहम पेडणेकर यांनी ४ सुवर्ण, अलिशा पालकर यांनी ४ सुवर्ण, तर पार्थ दाभोलकर यांनी ४ कांस्यपदके पटकावली.राज सारंग यांनी १ रौप्य व ३ कांस्य, भूपेश वराडकर यांनी ४ सुवर्ण, साहिल गावडे यांनी ४ कांस्य, यादेंश कुर्ले यांनी ४ कांस्य, शार्दुल खानोलकर यांनी १ सुवर्ण व १ कांस्य, वेदांत पेडणेकर यांनी २ कांस्य, गौरव माने यांनी २ कांस्य, गणेश बागायतकर यांनी २ सुवर्ण, तर परशुराम केसरकर यांनी २ कांस्यपदके मिळवून आपल्या कामगिरीची छाप पाडली.


या सर्व खेळाडूंच्या यशाबद्दल नाईक जिम अँड फिटनेस सेंटरचे प्रशिक्षक, पदाधिकारी, पालक व क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले असून, भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा