Vengurla news : अणसूर पाल हायस्कूलच्या खुशी गावडेची गोळाफेकमध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाची कामगिरी!

शेअर करा

डेरवण-चिपळूण येथे होणाऱ्या विभागीय मैदानी स्पर्धेसाठी खुशी गावडेची निवड!

वेंगुर्ला,दि.२८ ऑक्टोंबर

अणसूर पाल हायस्कूलच्या खुशी किशोर गावडे हिने १४ वर्षाखालील मुलींच्या गटात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला.त्यामुळे विभागस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यावतीने दि.२३ ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या गटात, खुशी किशोर गावडे हिने गोळाफेक प्रकारात दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिची डेरवण-चिपळूण येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यासाठी क्रीडा प्रशिक्षक हेमंत गावडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गोविंद गावडे, सचिव लिलाधर गावडे, खजिनदार बाळकृष्ण तावडे, शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर, सदस्य दिपक गावडे, दत्ताराम गावडे, देवू उर्फ बाबी गावडे , मुख्याध्यापक व सर्व शालेय परिवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा