वेंगुर्ला ,दि.१ सप्टेंबर (प्रथमेश गुरव)
वेंगुर्ला-माणिकचौक येथील शिवप्रेमी मित्रमंडळाच्यावतीने लहान गट १४ वर्षापर्यंत आणि मोठा गट १५ वर्षे व पुढे अशा दोन गटात गणेश वंदना ऑनलाईन नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे.
कोणतेही गणपती गीत निवडता येईल. नृत्य गणपतीच्या मूर्तीसमोर सादर करणे आवश्यक आहे. व्हिडिओचा कालावधी २ ते ५ मिनिटे असावा. १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत 9923482558 या नंबरवर व्हिडिओ पाठवावा. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिस देऊन गौरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी प्रथमेश यंदे यांच्याशी संपर्क साधावा.