वेंगुर्ला,दि.२७ ऑगस्ट
वेंगुर्ला-राऊळवाडा येथील रहिवासी पांडुरंग रामचंद्र सावंत (६५) यांचे २५ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते कृषी महाविद्यालय, मुळदे येथून वाहन चालक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, बहिण असा परिवार आहे.