छत्तीसगडमधील मुलगा व कामगाराचा शोध सुरू; पाणी कमी करूनही ठावठिकाणा नाही, मंगळवारी पुन्हा शोधमोहीम
दोडामार्ग, दि. १७ आॅगस्ट
तिलारी धरणातून कोणत्याही प्रकारची कल्पना न देता पाणी सोडले जाते, यामुळे या अगोदर देखील अनेक घटना घडल्या आहेत. कोनाळकट्टा घोटगेवाडी तिलारी नदी पाञातील काॅजवेवरून लोक ये जा करतात याची माहिती असताना घोटगेवाडी काॅजवेवरून पाणी कमी आहे म्हणून छत्तीसगढ
येथील एक कामगार लहान मुलगा जात असताना अचानक पाणी प्रवाह वाढल्याने लहान मुलगा तसेच कामगार असे दोन जण वाहुन गेले. या ठिकाणी पाणी बघण्यासाठी आलेल्या काही युवकांनी वाहुन जाताना व्हिडिओ काढला म्हणून समजले. तातडीने पाणी बंद करून शोध घेतला पण आढळून आले नाही.

घोटगेवाडी काॅजवेवरून दोन जण वाहुन गेले हे समजताच तिलारी धरणातून पाणी विसर्ग बंद करून
घटनास्थळी आलेल्या जलसंपदा अधिकारी यांना नागरीकांनी धारेवर धरले. कल्पना देवून पाणी सोडले नाही यामुळे त्यांचा जीव गेला असा आरोप केला शेकडो जण दाखल झाले होते.
दोडामार्ग पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले . पण अंधार पडल्याने मंगळवारी सकाळी शोध मोहीम राबवली जाणार आहे.
कोनाळकट्टा घोटगेवाडी काॅजवेवरून मोर्ले केर, घोटगेवाडी, जवळचा मार्ग पावसाळ्यात बंद असतो पण धरणातून पाणी कमी झाले कि घोटगेवाडी काॅजवेवरून ये जा करता येते. मोर्ले येथे कामासाठी आलेले छत्तीसगढ येथील मजूर कामगार अनूरज्जन किसफुट्टा बिजीपानी वय वर्षे २७ तसेच त्याच्या सोबत दुसऱ्या कामगाराचा मुलगा रेगण दिलीप बडा वय वर्षे आठ हे दोघे घोटगेवाडी काॅजवेवरून कोनाळकट्टा येथे आले तेव्हा पाणी कमी होते. ते कोनाळकट्टा येथून पुन्हा माघारी पायी चालत जात असताना घोटगेवाडी काॅजवेवर अचानक पाणी प्रवाह वाढला यामुळे दोघे जण पाण्याच्या झोतात वाहुन गेले. यावेळी काही युवक पाणी बघण्यासाठी आले होते त्यांनी पटकन व्हिडिओ काढला यामुळे ही घटना लक्षात आली अन्यथा कामगार मुलगा खोलीवर आला नाही हे समजल्यावर शोध सुरू झाला असता.