प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या सहकार्याने उपक्रम; पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांचा पुढाकार
कणकवली ,दि.१ सप्टेंबर
प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांच्या सहकार्याने व शिवशक्ती मल्टिस्पेशालिटी सर्व्हिसेस संचलित जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष, पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांच्या पुढाकाराने नांदगाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप आयनल येथे विद्यार्थ्यांना करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

आयनल गावातील पुर्व प्राथमिक शाळा, आयनल मणेरवाडी, प्राथमिक शाळा आयनल-गावठण, आयनल रोहीलेवाडी येथील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.यावेळी कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, आयनल सरपंच सिद्धी दहीबावकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, आयनल उपसरपंच विलास हडकर, माजी सरपंच बापु फाटक, सामाजिक कार्यकर्ते भाई साटम, पत्रकार ऋषिकेश मोरजकर आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे.