कुडाळ शहर भाजपाची महावितरणला धडक

शेअर करा

वीज सेवेसंबंधित तक्रारींचा वाचला पाढा

कुडाळ,दि.१ सप्टेंबर

कुडाळ शहरातील वीज सेवेबाबत कुडाळ शहर भाजपने आज महावितरणला धडक दिली. यावेळी शहरातील उद्भवणाऱ्या विविध समस्यांबाबत तसेच जुने जीर्ण झालेले लाईट पोल, कमी दाबाच्या होणाऱ्या वीजपुरवठा संबंधी लक्ष वेधले. वीजवाहक तारांवर आलेली जीर्ण धोकादायक झाडे तात्काळ तोडण्यासंबंधी यावेळी सूचना केल्या. तसेच वारंवार वीज खंडित केल्यामुळे शहरात असलेल्या गणेशशाळांना होणाऱ्या त्रासासंबंधीही सूचना केल्या. गणेश चतुर्थीच्या पूर्वी शहरात निर्माण होणाऱ्या तक्रारीचे तत्काळ निवारण करण्यासाठी अल्टिमेटम दिला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राजू राउळ, तालुका चिटणीस राजू गवंडे, शहराध्यक्ष सुनील बांदेकर महिला शहराध्यक्षा मुक्ती परब, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका ज्योती जळवी, नगरसेवक उदय मांजरेकर, निलेश परब, माजी नगरसेवक सचिन काळप उपस्थित होते.

शेअर करा