कुडाळ : हिर्लोकमध्ये वीजवाहिनी तुटून दोन जनावरांचा मृत्यू

शेअर करा

शेतक-यांना तुटपुंजी मदत नको : सरपंच प्राची सावंत

महावितरणकडून तुटपुंजी मदत देऊन शेतक-याची कुचेष्टा केल्यास आंदोलन छेडणार: उपसरपंच नरेंद्र राणे

कुडाळ,दि.१ सप्टेंबर

हिर्लोक-भटवाडी येथील शेतकरी गणेश शिवराम परब यांची गाभण गाय व एक दुभती म्हैस यांच्यावर विजेच्या तारा तुटून अंगावर पडल्याने दोन्ही जनावरे जागीच गतप्राण झाल्याची घटना घडली. ही घटना आज दुपारी घडली. या प्रकरणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांला किमान तीन लाखांची मदत देण्यात अशी मागणी हिर्लोक सरपंच प्राची सावंत आणि उपसरपंच नरेंद्र राणे यांनी केली आहे.
हिर्लोक-भटवाडी येथील शेतकरी शगणेश शिवराम परब यांची गाभण गाय व दुभती म्हैस नजिकच्या शेतात चा-यासाठी असताना अचानक वरील विजेच्या तारा तुटून दोन्ही जनावरांच्या अंगावर पडून गतप्राण झाली. त्यामुळे गरीब शेतकरी चिंताग्रस्त असुन पशुसंवर्धन विभागामार्फत दोन्ही जनावरांचे मुल्यांकन तुटपुंजे करुन शेत-याची चेष्टा केली आहे. महावितरणने या दोन्ही जनावरांची रक्कम किमान तीन लाख देण्याची मागणी सरपंच प्राची सावंत आणि उपसरपंच नरेंद्र राणे यांनी केली आहे. ही मदत लवकरात लवकर देण्यात यावी न पेक्षा कार्यकारी अभियंता महावितरण कुडाळच्या कार्यालयात हिर्लोक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार असल्याचे सावंत व राणे यांनी सांगितले. यावेळी पंचनामा करताना पोलीस पाटील दीपक कदम, हिर्लोक तलाठी संतोष बांदेकर, वीज मंडळाचे अधिकारी पाटील आणि ओरोस येथील वीज अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा