मालवण : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सायकल मॅरेथॉन व पारंपरिक खेळांचे आयोजन

शेअर करा

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वराडकर हायस्कूलचा संयुक्त उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मालवण,दि.१ सप्टेंबर
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग व वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशाळेच्या विद्यार्थ्यांची सायकल मॅरेथॉन व सायकल रॅली तसेच
पारंपरिक भारतीय खेळांचे प्रात्यक्षिक व प्रदर्शनीय सामने
संपन्न झाले

या सायकल रॅलीसाठी सायकलिंगचा प्रचार व प्रसार करणाऱ्या ‘ब्युटीज ऑन व्हील्स’ संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले. वराडकर हायस्कूल, कट्टा ते सावरवाड गणेश मंदिर या मार्गावर काढण्यात आलेल्या या रॅलीचे उद्घाटन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा शालेय समितीचे अध्यक्ष श्री. सुधीर वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या रॅलीमध्ये ‘ब्युटीज ऑन व्हील्स’चे अध्यक्ष डॉ. सोमनाथ परब यांच्यासह निलेश झाट्ये, प्रकाश सरमळकर, सुरेश कांबळी, जगदीश पेंडूरकर, सोनू पारकर, गणेश पारकर, रुपेश भोजने, अमित सावंत, निलेश हडकर आदी पदाधिकारी सहभागी झाले.

यावेळी डॉ. सोमनाथ परब यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात नियमित व्यायाम व सायकलिंगचा समावेश करावा, असे आवाहन केले तर प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी धनंजय गावडे यांनी निरोगी शरीर, निरोगी मन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले.

या सायकल रॅलीमध्ये सुमारे ७० सायकलिस्ट सहभागी झाले होते.
सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख श्री. संजय पेंडूरकर, क्रीडाशिक्षक श्री. किसन हडलगेकर, पर्यवेक्षक श्री. महेश भाट, तसेच समीर चांदरकर, भूषण गावडे, एकनाथ राऊळ, बाळकृष्ण वाजंत्री, नामदेव मासी, प्रवीण परुळेकर, रितेश जांभवडेकर यांनी विशेष मेहनत घेतली.
या उपक्रमासाठी कट्टा पोलीस स्टेशनचे श्री. मोरे व श्री. मुल्ला , प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण तसेच ग्रामीण रुग्णालय, पेंडूर-कट्टा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा