250 कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प साकार होणार.-आमदार दीपक केसरकर
मुंबई,दि.१ सप्टेंबर
आमदार श्री.दीपकभाई केसरकर यांच्या प्रयत्नाने दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी येथे आणखी एक नवीन कारखान्याचा प्रस्ताव ऑटोमेज कंपनीने सादर केलेला आहे. आज मुंबई येथे ऑटोमिक कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अतीन अग्रवाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)श्री.रवींद्र रणसिंग यांच्यासोबत आमदार श्री.दीपक केसरकर यांची बैठक झाली. ऑटोमेज कंपनी मार्फत 250 कोटी रुपयांची आडाळी येथे गुंतवणूक करण्यात येणार आहे. या कारखान्याच्या माध्यमातून 500 पेक्षा अधिक तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. भारतामध्ये या कंपनीचे विविध ठिकाणी पाच कारखाने सुरु आहेत आहेत. तसेच परदेशातही एक कारखाना सुरु आहे.