प्रस्तावांच्या अडचणींबाबत शिबिर
सिंधुदुर्ग,दि.१ सप्टेंबर
जिल्ह्यातील देवगड, मालवण, रेडी व बांदा या चार प्रभाव क्षेत्रांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रभाव क्षेत्रांमधील विकासविषयक प्रस्ताव सादर करताना अर्जदार, वास्तुविशारद तसेच विकासकांना येणाऱ्या विविध अडचणींचे निराकरण करून विकास परवानगीचे प्रस्ताव जलदगतीने निकाली काढण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरंगी सभागृहात दि. 1 व 2 सप्टेंबर 2026 रोजी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये प्राप्त होणाऱ्या अडचणींचे प्राधान्याने निराकरण करण्यात येणार आहे.